Wednesday, July 1, 2015

Venus-Jupiter Conjuction (गुरू आणि शुक्र यांची युती)



३० जून रोजी शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकमेकांच्या खूप जवळ आले. इतके जवळ की जर त्यांच्या पुढे चंद्र असता तर ते संपूर्णपणे झाकले गेले असते. खरंतर चंद्राच्या व्यासाच्या सुमारे एक तृतीआंश इतके जवळ. त्याशिवाय ही युती आकाशात क्षितीजापासून बर्‍यापैकी वर असल्याने सहज जगभरात दिसली. गुरू आणि शुक्र हे पुन्हा इतके जवळ यायला अणि सुर्यास्तानंतर दिसायला साधारण १०० वर्षे वाट पहावी लागेल असे गणित खगोलशास्त्रज्ञांनी मांडले आहे. दुर्दैवाने आमच्याकडे मान्सूनचे ढग आल्याने ३० जूनला फोटो काढता आला नाही, पण मिनिटभर का होईना डोळ्यांनी युती पाहता आली, १ जुलैला रात्री उशीरा आकाश मोकळे झाल्यावर मला फोटो घ्यायची संधी मिळाली. हा फोटो गुरू क्षितीजापासून ४ अंशावर असताना घेतला आहे. चंद्राप्रमाणे शुक्राच्याही कला दिसतात, वरील फोटोत काळजीपूर्वक पाहिल्यास शुक्राची कला दिसेल. त्याशिवाय गुरूजे चार मोठे चंद्रही (ज्याला गॅलिलीअन मून्स असं म्हणतात) गुरूच्या डाव्या बाजूला दिसत आहेत. (ज्यांना गॅलिलीअन मून्स असं म्हणतात)

No comments: