Tuesday, March 24, 2009

चहा!

चहाला माझ्या दिनक्रमात मानाचे स्थान आहे (म्हणजे आपल्याकडे ज्यावरून गणपतीची मंडळे भांडतात ना ते स्थान). कुठल्याही प्रकारचा चहा, मग तो पुण्याचा डायबेटिक चहा असो की कोल्हापुरचा खडी शक्कर, शीतलचा असो* किंवा चिंटू की चाय**, नेपाळी काळ्या मीरीचा अथवा बडीशेपेचा, फक्त दुधाचा वा chai latte, मी तो तितक्याच अभिमानाने फुरक्या मारत पीतो. हो, अमेरिकेत सुद्द्धा!

चहाशी निगडीत माझ्या फार आठवणी आहेत. माझ्या आजीचा तो गवळ्याने दुधात घातलेल्या पाण्याचा एक न एक थेंब संपे पर्यंत उकळून केलेल्या चहाची मला दररोज दुपारी तीन वाजता आठवण होते. आता मी असलो कि न विसरता साखर कमी घालते चहात, जवळजवळ दोन वर्षं झाली तीच्या हातचा चह पीऊन...

एका रविवारी नेहमी प्रमाणे स्विकारचा उपमा हदडून शीतल मध्ये चहा बरोबर कोणत्या तरी जागतिक समस्येचि उकल करीत आम्ही मित्र मंडळी बसलो होतो. वातावरण बरेच तापले होते आणि वेटरमहाशय बिल घेऊन हजर! चहाचा असा अपमान केला म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला त्याने बिल आणले की पुन्हा एक-एक कप चहा ऑर्डर करत होतो आणि शेवटी प्रत्येकी पाच कप ढोसूनच बिल भरले! कित्येक रात्री मी जागून अभ्यास करावयाचा प्रयत्न केला आहे तो केवळ मिळणार्‍या चहाच्या आशेने. आजही केव्हा रवीवार येतो आणी केव्हा कान्दे पोहे अन चहा असे होते! चहाला कधीही नाही म्हणत नाही अशी ओळख आहे माझी पंचक्रोशीत!

तसे चहाचे जागतिक इतिहासातले महत्व सांगायला नकोच, अमेरिकला स्वातन्त्र्य मिळाले ते चहामुळेच (आणि मग जगाचा इतिहास अमेरिकेने बदलला!).

पण घरच्या चहाची खरी किंमत रोज सकाळी उठल्यानंतर चहा बनवायची जेव्हा वेळ येते तेव्हाच कळते!

*कर्वे पुतळा
**डेक्कन

5 comments:

Dk said...

अरे व्वा तू सुद्धा चहाबाज प्राणी आहेस तर? मी ही! ( मी चहा/ कॉफी आणि असा भेद भाव न करता एकाच वेळी कितीही कप ढोसू शकतो!)

अच्छा लिखा है :) बादवे नावात>> नाव काय आहे? ;)

सखी said...

:) चहाची लहर आली की लेमन टी, आईस टी आणि कुठले कुठले टी....चहा म्हणजे अमृत आहे :)
welcome n keep posting!!

Nile said...

@Deep, Agadi 100 takke! Pan coffee babteet matra mi jara romantic ahe ;)
Tareef ke liye shukriya:).
Public madhye naav ghyayla lavtaay raao! :P

@Sakhi, is baat pe chaai honga mangta :P. Thanks for warm welcome. :)

Unknown said...

mi hi chahabaj zale ata! :D tyamule jaam awdla post.. tallaf ali! :)

भानस said...

तुमच्या चहापार्टीत मी पण सामील आहे. केव्हाही विचारा उत्तर होच असेल.