काही वर्षांपूर्वी एका मित्राच्या दिलदारीमुळे पु. लं आणि सुनिता देशपांडे यांनी कवी बा. भ. बोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत केलेल्या 'एक आनंदयात्रा कवितेची' या कार्यक्रमाची ध्वनीफित मला मिळाली. त्यानंतर ती मी अनेकदा ऐकलेली आहे हे सांगायला नको. या आधी बोरकरांच्या कविता आपण ऐकल्या कशा नव्हत्या ही सलही बोचली.
त्यातल्या काही निवडक कविता वाचनाच्या ध्वनिफीती मी माझ्यासाठीच पुन्हा पुन्हा ऐकाव्यात म्हणून वेगळ्या काढून ठेवल्या. कधीतरी त्यातली एखादी कविता ऐकायची लहर येते. फोन बदलले जातात. काहीतरी अडचणीमुळे फोनमधील ह्या फिती अचानक गायब होतात वगैरे प्रकार झाल्यानंतर युट्युबर ह्या अपलोड कराव्यात असे वाटले. आज इंटरनेटवर उपलब्ध असल्या म्हणजे त्यांचे अस्तित्व कायम राहिल अशीच जवळपास परिस्थिती आहे.
मुख्यत: माझ्यासाठीच असलेल्या ह्या फिती इतरांनाही ऐकायला मिळाव्यात. त्यातून त्यांनांही आनंद मिळावा ह्या हेतुने मी या युट्युबवर सर्वांना उपलब्ध करून देत आहे. त्या तुम्हाला आवडल्या तर जरूर कळवा. जमेल तसं यात भर घालत राहीनच.
युट्युबवरील प्ले-लिस्टचा हा दुवा: